एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत हातात बांधले घड्याळ

 स्थैर्य, मुंबई, दि.२३: कालपर्यंत भाजपचे जेष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून भाजपसाठी कार्य केले. मात्र राजकारणात झालेल्या अन्यायामुळे ते भाजपला रामराम ठोकत आता हातावर घड्याळ बांधले आहे.

राष्ट्रवादीच्या 11 दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश होत आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते अजित पवार प्रकृतीच्या कारणास्तव या सोहळ्याला उपस्थित नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश झाला आहे. दरम्यान एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेशासाठी गुरुवारी दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने सहकुटुंब मुंबईला दाखल झाले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांचीही उपस्थिती आहे.