एकनाथ खडसे यांचा निर्णय चुकलाच : ना. रामदास आठवले

 

स्थैर्य, फलटण, दि. २२ : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. एकनाथ खडसे यांचा सदरील निर्णय चुकला असून त्यांनी आरपीआय मध्ये प्रवेश करायला पाहिजे होतात व त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन केले असते असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

गोखळी ता. फलटण येथे केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची पाहणी केली यावेळी रामदास आठवले बोलत होते.

फलटण तालुक्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीने झालेल्या शेतकर्‍यांचे नुकसान याबाबत राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली पाहिजे व शेतकऱ्यांना यापुढे लागणाऱ्या शेतीविषयक गरजांसाठी ही शासनाने मदत जाहीर केली पाहिजे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya