29 ऑक्टोंबर व 3 नोव्हेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 


स्थैर्य, सातारा दि.२०: कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत 29 ऑक्टोंबर व 3 नोव्हेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली आहे.

या मेळाव्यात 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअर, पदवीधर उमेदवारांकरीता संधी आहे. आयोजित ऑनलाईन मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेवदवारांनी https:rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. याबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही सहायक आयुक्त श्री. जाधव यांनी केले आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya