माजी सैनिक नैसर्गीक आपत्ती निवारण कक्षात काम करण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 


स्थैर्य, सातारा दि.२०: जिल्हास्तरावर माजी सैनिक नैसर्गीक आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यासाठी व व्यवस्थापन तंत्र अवलंबित करावयाचे आहे. तरी जिल्ह्यातील जे माजी सैनिक इतर स्वयंसेवी संस्थाप्रमाणे स्वयंस्फुर्तीने आपत्ती व्यवस्थापनाकरिता विना वेतन, मानधन सेवा देण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी आपली नावे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात नोंदवावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.