माण तालुक्यात पाऊसामुळे शेतकऱ्याचा बळी

 


स्थैर्य, सातारा, दि. 16 : सलग दोन दिवस पडलेल्या परतीच्या  पाऊसाने हाहाकार माजवला असून, शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतातील विहिरी वरील विद्युत मोटार काढण्यासाठी गेलेले देवापुर ता माण येथील शेतकरी सुनिल सोपान बाबर वय 54 यांचा बंधाऱ्यावरून विहिरी कडे जाताना पाय घसरून पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याने माण तालुक्यात पाऊसामुळे शेतकऱ्याचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी देवापुर ता माण येथील शेतकरी सुनिल सोपान बाबर वय 54 हे आज दुपारी 11:30 च्या सुमारास शेतातील विहिरी वरील विद्युत मोटार काढण्यासाठी चालले असताना बंधाऱ्यावरून जात असताना पाय घसरल्याने ते पाण्यात पडले अगोदरच दोन दिवस परतीचा पाऊस जोरदार पडत असल्याने ओढे तुडूंब भरून वहात आहेत. त्यात ओढ्यावर बंधारा असून त्या बंधाऱ्यात ते पडले व बंधाऱ्यातील पाण्यात बोहरा तयार झाल्याने त्या बोहऱ्यात अडकल्याने पाण्याच्या प्रवाहातून बाहेर येणे अशक्य झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याने माण तालुक्यात पाऊसामुळे शेतकऱ्याचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपास सब इन्सपेक्टर रविद्र डोईफोडे करत आहेत.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya