फ्लेक्ससॅलरीने लॉंच केले ‘फ्लेक्सपे’

 

मुंबई, १५ ऑक्टोबर २०२०: नॅशनल पेमेंट कॉंसिल ऑफ इंडियाच्या सहकार्याने व्हीव्हीफी इंडिया फायनांन्स प्रायव्हेट लिमिटेड या एनबीएफसी कंपनीने फ्लेक्सपे लॉंच केले आहे. युपीआयच्या माध्यमातून पतपुरवठा (क्रेडीट) करणारा हा भारतातील पहिलाच पर्याय असेल. तुमच्या बँक खात्यात किंवा व्हॉलेटमध्ये फंड नसले तरी आता ‘स्कॅन करा आणि पैसे नंतर द्या’ (स्कॅन नाऊ अँड पे लेटर) या धोरणानुसार लाखो भारतीय या अभिनव योजनेचा लाभ घेण्यास सक्षम ठरतील. क्रेडिट कार्डधारक नसलेल्या ३०० दशलक्ष भारतीयांना या सुविधेचा फायदा होणार आहे. कोणतेही युपीआय, क्यु आर कोड स्कॅन करून किंवा युपीआय आयडीवरून ट्रांसफर करून तुम्ही या माध्यमातून ऑफलाईन खरेदीची सुविधा वापरू शकता.

व्हीव्हीफीचे संस्थापक व सीईओ अनिल पिनापाला यांनी सांगितले की, 'कमी उत्पन्न असणारे, ज्यांना नेहमीच आर्थिक चणचण भासते व मित्र, कुटूंब किंवा सावकाराकडून उधार पैसे घेणाऱ्यांना आता हा द्रविडी प्राणायाम करण्याची काहीही गरज असणार नाही. फ्लेक्सपेच्या माध्यमातून या साऱ्यांची संकटं दूर होणार आहेत. आम्ही मागील २ महिन्यांपासून सतत कार्यरत आहोत आणि आम्ही आता आमच्या ३०,००० वरील फ्लेक्ससॅलरी असलेल्या ग्राहकांना, ज्यांनी जवळपास ३ कोटी रुपये किंमतीच्या व्यवहारासाठी क्रेडिटचा वापर केला आहे, त्यांच्याकरिता फ्लेक्सपे हा पर्याय सक्षमपणे उपलब्ध करून दिला आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'देशभरात १२ दशलक्षाहून अधिक स्थानिक तात्पुरते (प्रोव्हिजनल) / किराणा स्टोअर दुकानदार क्रेडिट कार्ड पेमेंट प्रोसेस करत नाहीत. मात्र, ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी ते स्वत:हून त्यांना क्रेडीट देतात. या लॉंचमुळे या सुक्ष्म-उद्योजकांना आता स्वत: क्रेडीट (पत जोखीम) राखण्याची गरज नाही. त्यांनी आता त्यांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रीत करावे कारण आता त्यांच्या ग्राहकांना आता क्रेडीट पर्याय उपलब्ध झाला आहे.'

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya