माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, ट्विट करत दिली माहिती, डॉक्टरांच्या सल्लानुसार औषधोपचार सुरू

 

स्थैर्य, दि.२४: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. फडणवीस यांनीच ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. कोरोनाची साथ आल्यापासून मी दिवसरात्र काम करत आहे. मात्र आता मी ब्रेक घ्यावा अशी देवाची इच्छा असेल. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी क्वारंटाईन होत आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केले की, 'लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.'

देवेंद्र फडणवीस हे गेल्या अनेक दिवसांपासून नुकसानग्रस्त भागांचे दौरे करत आहेत.नुकताच त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. बारामतीतून त्यांचा दौरा सुरू झाला होता. पुणे, सोलापूर आणि उस्मानाबादमधील अनेक गावांमध्ये फडणवीसांनी पाहणी केली होती. तसेच त्यांनी बिहार निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारदौरेही केले होते.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya