जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांची 14 महीन्यानंतर सुटका; मागच्या वर्षी 370 हटल्यानंतर अटक झाली होती

 

स्थैर्य , दि.१४: पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या चीफ आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी(दि.13)सुटका झाली आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी याबाबत माहिती दिली. महबूबा यांना मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये काश्मीरमधून कलम 370 रद्द झाल्यानंतर अटक झाली होती.

महबूबा यांना 4 ऑगस्ट 2019 ला ताब्यात घेतले होते
महबूबा यांना जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द होण्याच्या एका दिवसापूर्वी 4 ऑगस्टच्या रात्री ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. 6 फेब्रुवारीला महबूबा यांच्या अकटेचा कालावधी संपण्यापूर्वी पब्लिक सेक्युरिटी अॅक्ट अंतर्गत त्यांच्यावर केस दाखल करण्यात आली होती आणि त्यांच्या नजरकैदेचा कालावधी वाढवला होता.

पब्लिक सेफ्टी अॅक्ट 1978 मध्ये लाकडाची तस्करी करण्याविरोधात बनला होता
पब्लिक सेफ्टी अॅक्ट 1978 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आला होता. या अंतर्गत कोणत्याही सुनावणीशिवाय 2 वर्षापर्यंत केदेत ठेवता येते. सुरुवातीला हा कायदा लाकडाची तस्करी करणाऱ्याविरोधात होता. पण, हळु-हळू इतर गुन्ह्यातही या कायद्याचा वापर करण्यात आला.

फारूक आणि उमर अब्दुल्ला यांची सुटका झाली आहे
महबूबा जम्मू-काश्मीरच्या एकमेव मोठ्या नेत्या होत्या, ज्यांना आतापर्यंत नजरकैदेत ठेवले होते. यापूर्वी माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांची सुटका करण्यात आली आहे. फारूक यांची 15 मार्च आणि उमर यांची 25 मार्चला सुटका करण्यात आली.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya