माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

 

स्थैर्य, मुंबई, दि. १५ : देशाचे माजी राष्ट्रपती, थोर अणुशास्त्रज्ञ, विद्यार्थीप्रिय शिक्षक, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस. डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

देशाला महाशक्ती बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्या दिशेने वाटचाल करणाऱ्या डॉ.कलाम यांच स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री यांनी त्यांना आदरांजली वाहिली. डॉ.कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होत असलेल्या ‘वाचन प्रेरणा दिना’च्याही उपमुख्यमंत्री यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

आमदार शेखर निकम ,मुख्य सचिव संजय कुमार, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहसचिव श्री .सूर्यवंशी यांनीही डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post