शाहूपूरी सुधारीत पाणी पुरवठा योजनेचे काम लवकर पुर्ण करा आ. शिवेंद्रसिंहराजे; शाहुनगरसाठी नवीन प्रस्ताव पाठवण्याच्या केल्या सुचना

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात श्रीमती पल्लवी चौगुले यांच्याशी चर्चा करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले. शेजारी आशुतोष चव्हाण, ङ्गिरोज पठाण, भारत भोसले यांच्यासह नागरिक


स्थैर्य, सातारा, दि.२३: शाहूपूरीवासीयांचा पाणीप्रश्‍न कायमस्वरुती सुटण्यासाठी शाहुपूरीच्या सुधारीत पाणीपुरवठा योजनेसाठी वाढीव १२ कोटी रुपये निधी नुकताच मंजूर करुन घेतला आहे. वन विभाग आणि वीज वितरण कंपनीच्या अडचणीबाबत संबंधीत अधिकार्‍यांनाही सुचना केल्या आहेत. पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु करण्यासाठी कोणतीही अडचण राहिली नाही. त्यामुळे शाहुपूरी पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरु करा आणि ते लवकरात लवकर पुर्ण करा, अशा सुचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती प‘वी चौगुले यांना केल्या. तसेच शाहूनगर त्रिशंकू भागाचा समावेश नगर पालिका हद्दीत झाला असल्याने या भागाचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी नवीन योजनेचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याची सुचनाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केली. 

शाहुपूरी पाणीपुरवठा योजनेसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून पुर्वीच ३१.३१ कोटी निधी मंजूर झाला होता. सध्या या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, उर्वरीत पाईपलाईनचे काम, टाक्या, नळजोडणी आदीसाठी वाढीव निधी मिळणे आवश्यक होते. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शाहुपूरी येथील सुधारीत पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला नुकतीच मंजूरी मिळवून १२ कोटी रुपये निधी मंजूर घेतला. आता हे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्राधिकण कार्यालयात जावून श्रीमती चौगुले यांची भेट घेतली आणि योजनेचा आढावा घेतला. यावेळी शाहुपूरीचे भारत भोसले, पिंटू कडव, बबलू जाधव, राजेंद्र मोहिते, विकास देशमुख, तुषार जोशी, पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण, ङ्गिरोज पठाण, कॉन्ट्रक्टर दिपक भिवरे, दरे ग‘ामपंचायतीचे सरपंच माने आदींसह शाहुपूरी आणि शाहूनगर येथील नागरिक उपस्थित होते. 

शाहुपूरी सुधारीत पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेताना जलवाहिनी टाकताना काही जागा वनविभागाची येत आहे. त्यासंदर्भात परवानगी मिळण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वन विभागाचे प्रवीण हाडा यांना त्याचकिाणाहून ङ्गोन करुन त्वरीत परवानगी देण्याच्या सुचना केल्या. तसेच योजनेसाठी लागणार्‍या एक्सप्रेस ङ्गिडरसाठीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता यांना ङ्गोनवरुन सुचना दिल्या. सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे योजनेचे काम तातडीने सुरु करा आणि लवकरात कलवर काम मार्गी लावा. तसेच नागरिकांना कनेक्शन ट्रान्सङ्गर आणि नवीन नळ कनेक्शन द्या, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी चौगुले यांना केल्या. येत्या तीन चार दिवसांत काम सुरु करुन लवकर योजना कार्यान्वीत करु, असे चौगुले म्हणाल्या. 

शाहूनगर या त्रिशंकु भागाचा समावेश नगर पालिकेत झाला आहे. त्यामुळे येथील निकष बदलला असून प्रती मानसी १४० लिटर पाणी यानुसार नवीन योजना कार्यान्वीत करण्यासाठी ङ्गेरप्रस्ताव तययार करा. नवीन प्रस्ताव त्वरीत तयार करुन मंजूरीसाठी शासनाकडे पाठवा, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केल्या. १५ दिवसांत प्रस्ताव तयार करुन मंजूरीसाठी शासनाकडे पाठवण्याचे श्रीमती चौगले यांनी यावेळी सांगितले. दरे ग‘ामपंचायतीची पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.