कोव्हिड-१९ च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सोने, क्रूड आणि धातूंच्या किंमतीत घसरण

 

स्थैर्य, मुंबई, दि.२२: कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत जगभरात चिंताजनक वाढ होत असल्याने सोने, क्रूड आणि बेस मेटलचे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे. अतिरिक्त मदतीच्या आशेने सोन्याचे उच्चांकी स्थितीत गेले. लिबियाने तेल उत्पादन वाढवले मात्र मागणीत उदासीनता असल्याने क्रूडचे दर घसरले. याउलट, चीनमधील औद्योगिक कामकाजात वाढ झाल्याने बेस मेटलचे दर सकारात्मक स्थितीत दिसून आले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

सोने: अमेरिकेकडून अतिरिक्त मदतीच्या आशेमुळे सोन्याचे दर काहीसे वधारले. स्पॉट गोल्डचे दर ०.९५% नी वाढले व १,९२४.५ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. कोरोना विषाणू मदत विधेयकावरून होणा-या घडामोडीमुळे पिवळ्या धातूच्या दरांना आधार मिळाला. कमी व्याजदर आणि जागतिक मध्यवर्ती बँकांनी साथीच्या उद्रेकापासून मोठ्या प्रमाणावत तरलता वाढवली असल्याने सोन्याचे दर २५ टक्क्यांनी वाढले. कारण सोने हे महागाई आणि चलन अवमूल्यनाविरोधात अवरोधक म्हणून काम करते.

साथीच्या आजारामुळे युरोपमध्ये पुन्हा निर्बंध लागल्यामुळे सोन्याच्या दरांना आणखी आधार मिळाला. जगभरातील कोरोना रुग्णसंख्येने ४०.८ दशलक्ष एवढा आकडा ओलांडला असल्याने सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याला अधिक झळाळी मिळाली. तथापि, आगामी नोव्हेंबर २०२० मधील राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीपूर्वी अमेरिकेकडून कोरोना मदत निधी मिळण्याचे काही संकेत दिसत नसल्याने सोन्याच्या दरावर काहीसा उदासीन परिणाम होऊ शकतो.

कच्चे तेल: साथीच्या आजाराचा व्यापक परिणाम होत असल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ३.४५% नी घसरले व ते ४०.० डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. युरोप आणि उत्तर अमेरिकेत कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ झाल्याने तेथे पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे तेलाच्या दरांवर दबाव आल्याने तेलाचे अर्थकारण विस्कळीत झाले आहे.

लिबियातील सर्वात मोठ्या तेल क्षेत्राने पुन्हा उत्पादन सुरु केल्याने त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले. मात्र मागणीत उदासीनता कायम असल्याने तेलाच्या दरांवर आणखी नकारात्मक परिणाम झाला. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशननुसार अमेरिकी तेलसाठा मागील आठवड्यात १ दशलक्ष बॅरलपर्यंत होता. कारण डेल्टा चक्रीवादळाने किनारीभागातील कामकाज ठप्प होते. तेलाच्या मागणीत वाढ झाल्याने सौदी अरेबियातील क्रूड निर्यातीला गती मिळाली. ऑगस्ट २०२० मध्ये ही निर्यात दररोज ५.९७ दशलक्ष एवढी होती. लिबियाने तेल उत्पादन वाढवले आणि साथीच्या आजाराची दुसरी लाट आल्याने क्रूडच्या दरांत आणखी घसरण होण्याची चिन्हे आहेत.

बेस मेटल्स: चीनच्या अर्थव्यवस्थेत निरंतर वृद्धी दिसून आल्याने एलएमई बेस मेटलचे दर हिरव्या रंगात स्थिरावले. तसेच अमेरिकी डॉलरचे मूल्य घसरल्यानेही दरांवर परिणाम झाला. इंटरनॅशनल लीड अँड झिंक स्टडी ग्रुपच्या अहवालात, चीनबाहेरील मागणीत मोठी घट झाल्याने जागतिक झिंक आणि लीड मार्केटमध्ये अतिरिक्त साठा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जुलै २०२० ते सप्टेंबर २०२० पर्यंत चीनचा जीडीपी ४.९% नी वाढला. त्यामुळे बेस मेटलला आणखी आधार मिलाला. मात्र युरोप आणि उत्तर अमेरिकेतील वाढत्या कोव्हिड रुग्णांमुळे धातूंच्या दरांतील नफा मर्यादित राहिला.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya