अमेरिकेतील राजकीय अनिश्चिततेने सोन्याच्या दरात वृद्धी

 


स्थैर्य, मुंबई, ९ : अमेरिकेतील राजकीय अनिश्चिततेमुळे सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेतनासाठी अतिरिक्त मदतीची मागणी केल्यानंतर निर्माण झालेल्या आशावादाने मागील सत्रात बेस मेटल आणि क्रूड तेलाच्या दरांना आधार मिळाला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.


सोने : युरोपमध्ये कोरोना विषाणूचे वाढते प्रमाण आणि अमेरिकेतील राजकीय अनिश्चितता यामुळे सोन्याच्या किंमतींना आधार मिळाला. स्पॉट गोल्डचे दर ०.३१% नी वाढले व १८९३.१ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. डॉलरच्या मूल्यात सुधारणा झाल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्यातील नफा मर्यादित राहिला. अतिरिक्त प्रोत्साहनपर मदतीच्या वाटाघाटी अमेरिकेतील पुढील निवडणुकांपर्यंत थांबवण्याचा निर्णय अध्यक्षड डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. अमेरिकेतील प्रवासी एअरलाइन्स कंपनीतील कर्मचा-यांच्या नोक-या वाचवण्यासाठी मदत म्हणून नव्या वेतनपटात २५ अब्ज डॉलर्स देण्याची सूचना त्यांनी काँग्रेसला दिली.


अशा प्रकारे कोरोना विषाणू मदत निधीबद्दल आशा वाढल्याने गुंतवणुकदारांची जोखिमीची भूक वाढली व त्यामुळे सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याची मागणी घटली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अतिरिक्त वेतनपटाची मागणी झाल्याने सोन्याला आणखी आधार मिळण्याची शक्यता आहे.


कच्चे तेल : तेलाच्या पुरवठ्याबद्दल चिंता असल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ३ टक्क्यांनी वाढले व ४१.२ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. अमेरिकेकडून अतिरिक्त मदतीच्या आशेने तेलाच्या दरांना आणखी आधार मिळाला. अमेरिकेच्या खाडी किनारपट्टीवर आलेल्या डेल्टा चक्रिवादळामुळे एकूण क्रूड उत्पादनात १७ टक्के योगदान देणा-या उर्जा कंपन्या ठप्प आहेत. त्यामुळे बिकट स्थिती निर्माण झाली आहे. युनियन आणि नॉर्वेयन तेल व वायू असोसिएशन दरम्यानच्या चर्चा अपयशी ठरल्याने नॉर्वेयन ऑफशोअर ऑइल व गॅस क्षेत्र बंद आहे. वेतनाच्या मागणीवरून अनेक कामगारांनी संपात सहभाग घेतल्याने तेलाच्या दैनंदिन ३३०,००० बॅरल उत्पादनावर प्रश्नचिन्ह उभे आहे. परिणामी तेलाच्या दरांना काहीसा आधार मिळाला.


बेस मेटल्स : अमेरिकेच्या वेतनपटासाठीच्या अतिरिक्त मदतीच्या आशेमुळे एलएमईवरील बेस मेटल हिरव्या रंगात स्थिरावला. चीनकडून मागणी वाढल्याने औद्योगिक धातूंच्या दरांना आणखी आधार मिळाला. सप्टेंबर २०२० पर्यंत चीनच्या औद्योगिक कामकाजात वेगाने सुधारणा दिसून आली. परिणामी


विदेशातील मागणी तसेच मदतीवर आधारीत पायाभूत सुविधांच्या विकासात वाढ दिसून आली. राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोने दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर २०२० मध्ये चीनचे अधिकृत मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजरचा निर्देशांक ५१.५ एवढा होता. तथापि, कोराना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची चिंता, डॉलरचे वाढते मूल्य आणि चीनमधील सप्ताह सुटीमुळे मागणीतील घट यामुळे नफ्यावर मर्यादा आल्या.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya