‘याहू’चा 15 डिसेंबरपासून गुडबाय; मेल सेवा बंद होणार

 स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१५: गेल्या काही वर्षांपासून सातत्याने निराशाजनक कामगिरी नोंदवत असलेल्या याहूकडून ‘याहू’ ग्रुप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 15 डिसेंबरचा दिवस निवडण्यात आला आहे. 2017 मध्ये याहू विकत घेतलेल्या वेरिझनने मंगळवारी आपला निर्णय जाहीर केला. याहू ही वेबर मधल्या काळातील सर्वात मोठी मेसेज बोर्ड सिस्टम राहिली आहे. मात्र, आता या वर्षाच्या शेवटी याहूचा प्रवास संपवणार आहे.

कंपनीने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटले आहे की, ‘याहू ग्रुप्सच्या वापरात गेल्या अनेक वर्षांपासून निरंतर घट होत आहे. सध्याच्या काळात ग्राहकांना प्रीमियम आणि विश्वासार्ह सामग्री हवी आहे, हे आम्ही पाहत आहोत. असे निर्णय घेणे कधीच सोपे नसते. परंतु, आमच्या दीर्घकालीन रणनीतीमध्ये योग्य असलेल्या उत्पादनांबद्दल आम्हाला कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. आता आम्ही व्यवसायाच्या इतर क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करू.

याहू ग्रुपची सेवा 2001 मध्ये सुरू झाली होती. मात्र, रेडिट, गुगल ग्रुप, फेसबुक यांच्या स्पर्धेत याहू तोंड देऊ शकले नाही. 12 ऑक्टोबरपासून नवीन ग्रुप तयार केले जाऊ शकणार नाहीत आणि 15 डिसेंबरनंतर याहू ग्रुप्सद्वारे लोक मेल पाठवू किंवा प्राप्त करू शकणार नाहीत. वेबसाइट देखील उपलब्ध होणार नाही. तथापि याहू मेल पूर्वीप्रमाणेच काम करत राहील. आपण पाठविलेले आणि प्राप्त केलेले मेल आपल्या ईमेलमध्ये सेव राहतील. परंतु, 15 डिसेंबरपासून वापरकर्त्यांना मेल पाठविणे आणि प्राप्त करणे शक्य होणार नाही, असे कंपनीने सांगितले. अमेरिकन वायरलेस कम्युनिकेशन्स सर्व्हिस प्रदाता वेरिझन यांनी 2017 मध्ये 4.8 अब्ज डॉलर्समध्ये याहूचा संपूर्ण इंटरनेट व्यवसाय खरेदी केला.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya