गिरवी येथे कृषिदूतांकडून शेतकर्‍यांना मार्गदर्शन

 

स्थैर्य, फलटण दि.१३ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित असणार्‍या रत्नाई कृषि महाविद्यालय, अकलूज अंतर्गत कृषिदूत सुरज राजेंद्र कदम यांनी गिरवी, ता.फलटण येथे ग्रामीण जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन करुन शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. 

यावेळी सुरज कदम यांनी माती परिक्षण, निंबोळी अर्कचा वापर, एकात्मिक व्यवस्थापन, शेतीविषयक मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच आदींची माहिती शेतकर्‍यांना दिली. तसेच गावामध्ये शून्य ऊर्जा शीत कक्षाची उभारणी करुन त्याचेही महत्त्व शेतकर्‍यांना पटवून दिले. 

सदरचा उपक्रम कृषिदुत शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.डी.पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी.नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा.एस.एम.एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.आर.आडत व प्रा.डी.एम.मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत सुरज कदम यांनी यशस्वीरित्या पार पाडला.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya