हाथरस प्रकरणाचा गुंता वाढला !

 

स्थैर्य, हाथरस, दि.९: हाथरस सामूहिक बलात्कार आणि मृ्त्यू प्रकरणात विविध प्रकारचे दावे केले जात आहेत. तुरुंगात असलेल्या आरोपींनी हाथरसच्या पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून स्वत:ला निर्दोष असल्याचे म्हटले आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांनीच पीडितेची ऑनर किलिंग केले असल्याचा या आरोपींनी आरोप केला आहे. पीडिता आपल्या पहिल्या जबाबात एकच नाव घेत होती, असे आरोपीच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. पीडितेचा भाऊ आणि आरोपीची नावे समान असल्याचे आरोपीच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. प्रथम कॉल डीटेल आणि त्यानंतर आरोपींचे पत्र आल्यानंतर आता नावाच्या दाव्याबाबतचा मुद्दा उपस्थित झाल्याने हासरथ प्रकरणाचा गुंता अधिकच वाढला आहे.

ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीने सुरुवातीला एकच नाव घेतले होते आणि तिच्या भावाचेही नाव तेच आहे, असे हासरथ प्रकरणातील एका आरोपीच्या चुलत्याने म्हटले आहे. त्यानंतर ठाकूराच्या मुलाने माझा गळा दाबला असे पीडितेने आपल्या आईला सांगितले, असे हा चुलता एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya