व्यावसायिकास एक कोटींची खंडणी मागून २१ लाख रुपये घेतले, तिघांवर गुन्हा

 

स्थैर्य, वडूज, दि.७: व्यवसायिकाला एक कोटींची खंडणी मागून एकवीस लाखांची खंडणी स्वीकारणाऱ्या तिघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याबाबत हकिकत पुढीलप्रमाणे खटाव तालुक्यातील एक व्यवसायिकाला दि.14/05/2017 रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास एम एच 12 जीआर 1883 या क्रमाकांच्या स्विफ्ट गाडीतून तसेच अन्य एक चारचाकी व पिकअप वाहनातून येऊन अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच आयकर अधिकारी असल्याचे भासवून तक्रारदार यांचा भाऊ व कामगारांना मारहाण सुरू केली. तसेच संशयित आरोपींनी तू त्याठिकाणी असलेल्या कामगारांचे मोबाइल काढून घेत, तक्रारदाराचा भावाला सांगून तक्रारदार यांना बोलावून घेण्यास सांगितले. तक्रारदार फोन आल्यानंतर घटनास्थळी आल्यानंतर संशयितांनी तू भेसळ करतोस याचे आमच्याकडे पुरावे आहेत. त्याचे आम्ही शुटींग केल्याचे सांगितले. तुझ्यावर कारवाई न करण्यासाठी व केलेले व्हिडिओ शुटींग बाहेर कोणाला न दाखवण्यासाठी म्हणून एक कोट रूपयांची मागणी केली . त्यावर तक्रारदाराने माझ्याकडे पैसे नाहीत, तूम्ही मला त्रास नका देऊ अशी विनवणी केली. मात्र,संशयितांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्यावर दहशत तयार करून संशयित क्रं 1 याने व संशयित क्रं 2 या दोघांनी तसेच इतर संशयितांनी संगणमत करून तक्रारदार यांच्याकडून रोख11 लाख रुपये व पाच लाख रुपयाचा स्टेट बॅंक शाखा वडूजचा धनादेश जबरदस्तीने नेला. तसेच त्यानंतर सन 2018 व 2019 या दोन्ही सालात त्यातील संशयित क्रमांक एक याने व्हिडिओ शुटींग व्हायरल करण्याची भिती दाखवून प्रतिवर्षी पाच लाख रुपये नेले. सन 2020 या सालात संशयित क्रंमाक एक याने पुन्हा पैशाची मागणी केली होती. पण तक्रारदाराने करोनामुळे धंदा नसल्याचे सांगून पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संशयित क्रं 1 याने तो काम करत असलेल्या यू ट्यूब चैनेलवर तक्रारदाराला भिती दाखवण्यासाठी त्याच्याशी संबंधित बातमी प्रसिद्ध केली होती. तरीही तक्रारदार पैसे देत नसल्याने संशयित क्रं 1 याने तू आम्हाला पैसे दिले नाहीत तर तूला बघतो, तू कसा धंदा करतो तेच बघतो अशी धमकी दिली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी एकूण सात ते आठ लोकांच्याविरोधात एकवीस लाखांची खंडणी नेल्याची वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.