ठाकरे सरकारची महत्त्वाची घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटींचे पॅकेज केले जाहीर

 

स्थैर्य, मुंबई, दि.२३: राज्यभरात परतीच्या पावासाने थैमान घातल शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान केले आहे. यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याच यावी अशी मागणी केली जात होती. आता राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.

राज्य सरकार ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीने वितरित करणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केले. यासोबतच राज्याचे केंद्राकडे 38 हजार कोटी थकीत आहेत. केंद्राने अजूनही ही रक्कम दिली नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. दिवाळीपर्यंत ही मदत देण्यात येणार आहे. सणासुदीत बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, या आपत्तीत 10 हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे. पैशाची ओढाताण आहे, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द आहे. जिरायत, बागायत जमिनीसाठी 6800 प्रति हेक्टर ही केंद्राची मदत अपुरी आहे त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी 10 हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे. फळपिकांसाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर ऐवजी 25 हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya