फलटण शहर तालुक्यात आतापर्यंत ३१२१ बाधीत, २१९२ बरे झाले, ८८ जणांचे दुर्दैवी निधन

 

स्थैर्य, फलटण दि. २ : फलटण शहर व तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव सतत वाढत असून त्याच्या नियंत्रणासाठी शासन/प्रशासन प्रयत्नशील असूनही सदर विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येते.


८४१ जणांवर उपचार सुरु
फलटण शहर व तालुक्यात आज अखेर ३१२१ कोरोना बाधीत आढळून आले असून त्यापैकी २१९२ आजपर्यंत बरे झाले आहेत, तर ८८ व्यक्तींचे दुर्दैवी निधन झाले आहे. ८४१ जणांवर उपचार सुरु आहेत.


बरड प्रा. आरोग्य केंद्र कक्षेत ६५ जणांवर उपचार सुरु

बरड प्रा.आरोग्य केंद्र कक्षेत आतापर्यंत ४०० कोरोना बाधीत आढळले त्यापैकी ३२६ बरे झाले, ९ जणांचे दुर्दैवी निधन झाले. आज ६५ व्यक्ती उपचार घेत आहेत, त्यापैकी ४९ गृह विलगी करणात, ६ कोरोना केअर सेंटर मध्ये, २ उप जिल्हा रुग्णालयात, ४ खाजगी रुग्णालयात आणि ४ अन्यत्र उपचार घेत आहेत.


बिबी प्रा. आरोग्य केंद्र कक्षेत २२ जणांवर उपचार सुरु
बिबी प्रा. आरोग्य केंद्र कक्षेत आतापर्यंत १०६ कोरोना बाधीत आढळले त्यापैकी ७९ बरे झाले, ५ जणांचे दुर्दैवी निधन झाले. आज २२ व्यक्ती उपचार घेत आहेत, त्यापैकी १५ गृह विलगी करणात, १ कोरोना केअर सेंटर मध्ये, २ उप जिल्हा रुग्णालयात, २ खाजगी रुग्णालयात आणि २ अन्यत्र उपचार घेत आहेत.


गिरवी प्रा. आरोग्य केंद्र कक्षेत  १४७ जणांवर उपचार सुरु
गिरवी प्रा. आरोग्य केंद्र कक्षेत आतापर्यंत ५०० कोरोना बाधीत आढळले त्यापैकी ३३५ बरे झाले, १८ जणांचे दुर्दैवी निधन झाले. आज १४७ व्यक्ती उपचार घेत आहेत, त्यापैकी ११५ गृह विलगी करणात, ४ कोरोना केअर सेंटर मध्ये, २ उप जिल्हा रुग्णालयात, २५ खाजगी रुग्णालयात आणि १ अन्यत्र उपचार घेत आहेत.


राजाळे प्रा. आरोग्य केंद्र कक्षेत ८८ जणांवर उपचार सुरु
राजाळे प्रा.आरोग्य केंद्र कक्षेत आतापर्यंत ३४८ कोरोना बाधीत आढळले त्यापैकी २५० बरे झाले, १० जणांचे दुर्दैवी निधन झाले. आज ८८ व्यक्ती उपचार घेत आहेत, त्यापैकी ६२ गृह विलगी करणात, १६ कोरोना केअर सेंटर मध्ये, १ उप जिल्हा रुग्णालयात, ८ खाजगी रुग्णालयात आणि १ अन्यत्र उपचार घेत आहेत.


साखरवाडी प्रा. आरोग्य केंद्र कक्षेत  ९४ जणांवर उपचार सुरु
साखरवाडी प्रा. आरोग्य केंद्र कक्षेत आतापर्यंत ३४१ कोरोना बाधीत आढळले त्यापैकी २३७ बरे झाले, १० जणांचे दुर्दैवी निधन झाले. आज ९४ व्यक्ती उपचार घेत आहेत, त्यापैकी ६८ गृह विलगी करणात, १६ कोरोना केअर सेंटर मध्ये, ० उप जिल्हा रुग्णालयात, १० खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.


तरडगाव प्रा. आरोग्य केंद्र कक्षेत ४८ जणांवर उपचार सुरु
तरडगाव प्रा. आरोग्य केंद्र कक्षेत आतापर्यंत २२८ कोरोना बाधीत आढळले त्यापैकी १७३ बरे झाले, ७ जणांचे दुर्दैवी निधन झाले. आज ४८ व्यक्ती उपचार घेत आहेत, त्यापैकी ३५ गृह विलगी करणात, ३ कोरोना केअर सेंटर मध्ये, ० उप जिल्हा रुग्णालयात, १० खाजगी रुग्णालयात आणि ० अन्यत्र उपचार घेत आहेत.


शहर नागरी आरोग्य सुविधा केंद्र कक्षेत ३७७ जणांवर उपचार सुरु
फलटण शहरातील नागरी आरोग्य सुविधा केंद्र कक्षेत आतापर्यंत ११९८ कोरोना बाधीत आढळले त्यापैकी ७९२ बरे झाले, २९ जणांचे दुर्दैवी निधन झाले. आज ३७७ व्यक्ती उपचार घेत आहेत, त्यापैकी ३१७ गृह विलगी करणात, २० कोरोना केअर सेंटर मध्ये, १२ उप जिल्हा रुग्णालयात, २३ खाजगी रुग्णालयात आणि ५ अन्यत्र उपचार घेत आहेत.


अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ प्रयत्नशील
प्रांताधिकारी तथा इंसिडन्ट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप, प्रभारी तहसीलदार रमेश पाटील, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पोटे व त्यांचे सहकारी प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्यंकटेश धवन, डॉ. सुभाष गायकवाड, यांच्यासह प्रशासनातील अन्य अधिकारी कर्मचारी, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन सावंत, गाव पातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी वगैरे कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्नशील असून त्यांना सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांचे, स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांचे सहकार्य लाभत आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya