कोरोना महामारीत देशात लोकांनी आयपीओत गुंतवले 5 लाख कोटी

 

स्थैर्य, दि.१०: कोरोनामुळे देशातील आर्थिक संकटादरम्यान विविध कंपन्यांच्या आयपीओत लोकांचा विश्वास वाढला आहे. ब्रॉकरेज हाऊस व आयपीओ मर्चंट बँकर्सनुसार देशभरात लॉकडाऊननंतर आयपीओत गुंतवणूकदारांनी ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. बहुतांश गुंतवणूकदारांना ८० टक्क्यांपेक्षा जास्त कंपन्या जागतिक महामारीत चांगला परतावा देतील अशी आशा आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लहान गुंतवणूकदार कमी पैशात सुरक्षित गुंतवणूक समजत आहेत. यामुळे आयपीओत गुंतवणूक वाढत आहेत. आयपीओला इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणतात. यात कंपन्या स्वत:ला लिस्टेड करून गुंतवणूकदारांना समभाग विकतात.

यामुळे गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरताहेत आयपीओ

- इक्विटी मार्केटमध्ये येण्यात जोखीम अधिक असते. त्याऐवजी आयपीओत जाेखीम कमी.

- आयपीओ आणणारी कंपनी विश्वासार्हता वाढवण्यासाठी कमी प्रीमियमवर ऑफर देतात. यामुळे फायदा होतो.

- शेअर आल्यानंतर गुंतवणूकदार नफा मिळवत (विकणे-मूल्य जास्त झाल्यावर) परतावा प्राप्त करण्यासाठी मोकळा होतो. असे करून गंुतवणूकदाराला मिळालेली रक्कम- नफा दुसरीकडे गुंतवणुकीचा पर्यायही असतो.

- ७५ टक्क्यांपेक्षा जास्त कंपन्यांची पॉझिटिव्ह लिस्टिंग होते. नफ्याची शक्यता अधिक असते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya