गृहिणींसाठी गुंतवणुकीचे पर्याय

 

स्थैर्य, दि.२०: घरी राहत असल्याने अनेक गृहिणी आणि माता पूर्णवेळ विनामोबदला काम करत असतात. त्यामुळे घरगुती गरजांसाठी पुरेसे उत्पन्न मिळवणे, कठीणच जाते. सुदैवाने, घरी राहून, मुलांकडे लक्ष देत असतानाच पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. घरून काम करतानाच तुम्ही सहजपणे आर्थिक नियोजनाविषयी शिक्षण घेऊ शकता. याविषयी अधिक माहिती देत आहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीएमओ श्री प्रभाकर तिवारी.

१. अतिरिक्त भांडवल बचतीसाठी वर्क फ्रॉम होम: घरी राहून काम करण्याचे अनेक मार्ग आहेत. मुक्त लिखाण, घरगुती व्यवसाय, ऑनलाइन शिकवणे इत्यादी. मुक्त लिखाण करण्यासाठी तुम्हाला एखाद्या विषयावरील ब्लॉग लिहावा लागतो. तुम्हाला कधी लिहायचे, कोणत्या उत्पादनाला प्रोत्साहन देऊ शकता किंवा लेखक हव्या असलेल्या एजन्सीशी तुम्ही संपर्क साधू शकता. पार्ट टाइम कामही करू शकता. तुम्ही घरगुती व्यवसायदेखील सुरू करू शकता. उदा. अनेक गृहिणींनी हँडमेड दागिने, खाद्य पदार्थ सेवा, स्वयंपाक घरातील लोणचे, नट बटर्स इत्यादी आवश्यक गोष्टींचे व्यवसाय सुरू केलेले आहेत. तुम्ही तुमचे ज्ञान आणि कौशल्याचा वापर करून ऑनलाइन अभ्यासक्रमही शिकवू शकता. मासिक बजेट नियमितपणे येणे आणि अनावश्यक खर्च टाळणे खूप महत्त्वाचे आहे. बचत करण्याला प्राधान्य देणे आणि त्यातून उरलेल्या रकमेत खर्च करणे हा आदर्श दृष्टीकोन आहे. यामुळे वित्तीय साधनात गुंतवणूक करण्याचे एक प्रकारचे भांडवल मिळते.

२. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास शिकणे: गृहिणी-माता असल्याने तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक आणि ट्रेडिंग यासारख्या विविध वित्तीय साधनांची माहिती करुन घेणे आवश्यक आहे. विश्वसनीय न्यूज वेबसाइटवरून तुम्ही वैयक्तिक अर्थव्यवस्थापनाच्या अनेक पैलूंबद्दलही ऑनलाइन शिक्षण घेऊ शकता. यासाठी आर्थिक क्षेत्रातील एखाद्या विश्वासू मित्राचीही मदत घेऊ शकता. इक्विटी, कर्ज, रोख, सोने, रिअल इस्टेट यासारख्या मालमत्ता वर्गाची माहिती घेणे व त्यांचे कार्य समजून घेणेही आवश्यक आहे. यासोबतच, स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स, मुदत ठेवी इत्यादीसारख्या साधनांबद्दलही माहिती घ्यावी. गुंतवणुकीचे पाऊल उचलण्यापूर्वी प्रत्येकाने स्वत:च्या आर्थि उद्दिष्टांचे मूल्यांकन करणे आणि त्यानुसार, ते मिळवण्यासाठी आर्थिक साधनांची निवड करणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे, गुंतवणुकीचा तपशील जाणून घेण्यासाठी, भरपूर वेळ घ्या, परंतु त्यासाठी टाळाटाळ करू नका. जेवढ्या लवकर आपण सुरुवात कराल तेवढे चांगले होईल, कारण एकत्रित प्रयत्नांची शक्ती प्रभावी ठरते.

३. अतिघाई करू नका: एकदा गुंतवणुकीचा प्रवास सुरू केला की योग्य संतुलन राखले पाहिजे. शेअर बाजार हा असंख्य अस्थिरतेचा साक्षीदार असतो. ही जागाच दोलायमान असते. मात्र दीर्घकालीन विचार करता, बाजार अंदाजानुसार वर्तन करतो. त्यामुळे तुमची उद्दिष्टे लिहून ठेवा व दीर्घकाळासाठी त्यात गुंतवणूक करा. यासाठी गुंततवुकीचा अधिकार यासाठी मदत करू शकतो. कोणत्याही अस्थिरतेतून प्रवास करताना आपण विविध मालमत्ता वर्गात वैविध्य ठेवू शकतो. चढ-उतारावर मात करण्यासाठी आणखी एक पर्याय म्हणजे, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) मार्फत गुंतवणूक करणे. त्यामुळे हे सुनिश्चित होईल की, तुमच्या मासिक खर्चातून काही बचत होऊ शकते, गुंतवणुकीची शिस्त लागेल तसेच दीर्घकालीन लाभांशाचा आनंद मिळेल.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya