जे. बी. जाधवांचा समाजभुषण पुरस्काराने गौरव

 

मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार स्विकारताना जे. बी. जाधव

स्थैर्य, कातरखटाव, दि. ०२ : वरुड (ता. खटाव) येथील वेद सामाजिक संस्थेने अधिक मासानिमित्त आयोजित केलेला धार्मिक कार्यक्रम व विविध क्षेत्रातील गुणीजनांचा पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. वडी येथील जेष्ठ कार्यकर्ते जे. बी. तथा जगन्नाथ बंडू जाधव यांना समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.


मांडवे येथील हरीओम तिर्थनारायण स्वामी यांच्याहस्ते पुरस्कार वितरण झाले. यावेळी नातेपुते येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, कामधेनू परिवाराचे कार्याध्यक्ष धैर्यशिलभाऊ देशमुख यांना वाचस्पती पुरस्कार, भागवताचार्य श्रीराम शास्त्री जोशी यांना वेदाचार्य, बेळगांव येथील डॉ. ओंकार कुलकर्णी यांना धन्वंतरी पुरस्कार, कराड येथील पुरुषोत्तम भेरे यांना ज्योतिषाचार्य पुरस्कार देण्यात आले. यावेळी बोलताना हरीओम स्वामी म्हणाले, कोरोनाची भयानक असताना देखील वेद सामाजिक संस्थेने छोटेखानी धार्मिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित करुन लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. हा संस्थेचा उपक्रम अतिशय स्तुत्य व कौतुकास्पद आहे.


धैर्यशिल देशमुख म्हणाले, अध्यात्म व प्राचीण आयुर्वेदासारख्या उपाय योजनेतून कोरोना महामारीवर चांगला इलाज होवू शकतो. पुरस्कार मिळाल्यामुळे समाजासाठी आणखी चांगले काम करण्याचे बळ मिळते. वेद सामाजिक संस्थेने आपणास दिलेला पुरस्कार आगळा वेगळा आहे. या निमित्ताने अध्यात्म व वास्तु क्षेत्रातील तज्ञांची काही काळ संगती लाभली. त्यामुळे दिवस आनंदी गेला. हा अनुभव आयुष्यभर उपयोगी पडेल.


संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन खटावकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी डॉ. ओंकार कुलकर्णी, भागवताचार्य जोशी, धनंजय क्षीरसागर यांची मनोगते झाली. प्रशांत कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले. नितीन पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास वेदमूर्ती बाळासाहेब खटावकर, अ‍ॅड. सोमनाथ भरमगुंडे, वसंतराव गोसावी, दादासाहेब येवले-पाटील,दिपकराव तंडेबडवे  विष्णूपंत शिंदे, प्रकाश चव्हाण, जगन्नाथ येवले, सचिन येवले, आनंद भंडारे आदिंसह मान्यवर यजमान उपस्थित होते.


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya