कानिफनाथ ननावरे यांचे निधन


स्थैर्य, फलटण, दि.१०: येथील महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कानिफनाथ दत्तात्रय ननावरे (वय 48) यांचे (दि.10 रोजी) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जाधववाडी, ता.फलटण येथील राहत्या घरी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्‍चात एक बहिण, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. 

कानिफनाथ ननावरे हे सन 1996 पासून आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकजागर प्रतिष्ठान आदी संस्थांच्या माध्यमातून शिक्षण, सामाजिक, साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्राशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना नुकताच नाशिक येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचा ‘शिक्षक रत्न’ पुरस्कारही जाहीर झाला होता. 

‘‘महात्मा एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी आदी संस्थांच्या आजवरच्या वाटचालीत कानिफनाथ ननावरे यांचे उत्तम योगदान होते. त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल मोठा धक्का बसला असून, त्यांचे योगदान सदैव आमच्या स्मरणात राहील’’, अशा शब्दात महात्मा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव शिंदे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Previous Post Next Post