काश्मीर : लश्करचा टॉप कमांडर सैफुल्लाह आणि दहशतवादी इर्शाद चकमकीत ठार

 

स्थैर्य, श्रीनगर, दि.१२: जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये झालेल्या सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कंमांडर सैफुल्लाह ठार ढाला आहे. सैफुल्लाह हा पाकिस्तानी नागरिक होता. तर चकमकीत मारला गेलेला दुसरा दहशतवादी इर्शाद हा असून तो पुलवाम्याचा रहिवासी आहे. तो लश्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर आहे. सध्या या परिसरात सुरक्षादलाची शोध मोहीम सुरू आहे.

पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, पाकिस्तानचा दहशतवादी असलेला सैफुल्लाह याच्यासोबत लश्कर-ए-तोयबाशी संबंधित एक स्थानिक दहशतवाद्याला घेरण्यात आले होते. सैफुल्लाह सप्टेंबरमधील आणि नुकत्याच झालेल्या नौगाम येथील सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. यात दोन जवान शहीद झाले होते.

प्रथम दहशतवाद्यांनी सुरू केला गोळीबार

एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाला या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दहशतवाद्यांचा शोध सुरू झाला. हे संयुक्त पथक दहशतवादी लपलेल्या भागात पोहोचताक्षणी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya