खडसेंनी स्वत: केलेल्या उद्योगांचा विचार करावा; भाजपाची खोचक टीका

 

स्थैर्य, मुंबई, दि.२३: एकनाथ खडसेंनी भाजपावर आरोप करताना स्वत: काय उद्योग केले होते त्याचा विचार करावा. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. भाजपावर आरोप करण्यापेक्षा एकनाथ खडसेंनी आत्मचिंतन करावं, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. एखाद्याची स्वप्न जर त्याच्या त्याच्या इच्छेच्या पुढे जात असतील तर त्याला आपण आळा घालू शकत नाही, असंही लाड यांनी म्हटलं आहे.

कुणावरही आरोप करणं सोपं असतं पण ते सिद्ध करणं कठीण असतं. फक्त भाजपावर किंवा पक्षातील नेतृत्त्वावर आरोप करण्यासाठी खडसेंचा वापर होऊ नये. एकनाथ खडसेंचा उपयोग राष्ट्रवादीने महाराष्ट्राच्या विकासासाठी करावा असाही टोला लाड यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे. खडसेंना राष्ट्रवादीत एकाधिकारशाही काय असते तेदेखील चांगले कळेल असंही लाड यांनी म्हटलं आहे.

खडसेंना मंत्रिपद मिळावं, फक्त भाजपावर आरोप करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादीने पक्षात घेतलं असं होऊ नये असंही प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर भाजपावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आपण स्वत: काय उद्योग केले आहेत त्याचाही विचार करावा असंही लाड यांनी म्हटलं आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya