एमजी मोटर इंडियाद्वारे १० नव्या शहरांमध्ये झेडएस ईव्हीच्या विक्रीला सुरुवात

 

स्थैर्य, मुंबई, दि.२: एमजी मोटर इंडियाने नागपूर, लखनौ, आग्रा, देहरादून, लुधियाना, कोलकाता, औरंगाबाद, इंदूर, कोइंबतूर आणि विजाग या नव्या १० शहरांमध्ये इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही - एमजी झेडएसचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी भारतभरातील ११ ऑपरेशनल बेसमध्ये ती उपलब्ध आहे. कारनिर्मात्याने फेब्रुवारी २०२० मध्ये देशात झेडएस ईव्हीची डिलिव्हरी सुरु झाल्यापासून १००० वे युनिट रोल आउट केल्यानंतर हा विस्तार कार्यक्रम हाती घेतला आहे.

आजपासून कंपनी प्री-बुकिंग सुरू करणार असून, ५०,००० रुपये अशी बुकिंग किंगमत आहे. एमजी मोटर इंडिया ची वेबसाइट (mgmotor.co.in) वर तसेच विविध शहरांमधील डीलरशिपवर ती उपलब्ध असेल. नव्या विस्तारामुळे एमजी झेडएस ईव्ही भारतातील २१ शहरांमध्ये उपलब्ध असेल. याच वेळी एमजी या शहरांमध्ये समांतररित्या ईव्ही इकोसिस्टिम विकसित करत असून त्याअंतर्गत सुपरफास्ट चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑन-रोड चार्जिंग सुविधा विस्तारल्या जात आहेत.

एमजी मोटर इंडियाचे मुख्य वाणिज्य अधिकारी गौरव गुप्ता म्हणाले, “हरित ऊर्जा आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सध्या भारत कौतुकास्पद पावले उचलत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने अलीकडे घेतलेल्या निर्णयांचे आम्ही स्वागत करतो. भारतातील ईव्ही च्या वाढत्या मागणीसाठी ते अनुकुल आहेत व त्यात त्यांचे योगदानही आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आमच्या झेडएस ईव्ही विस्ताराचा पुढील कार्यक्रम हाती घेताना आम्हाला आनंद होत आहे. देशात ईव्ही चा चांगल्या प्रकारे स्वीकार होण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्नरत आहोत.

एमजी मोटर इंडिया ची टाटा पॉवर आणि फिनलँडमधील क्लिन एनर्जी मेजर फोर्टमसोबत देशभरात फास्ट-चार्जिंग स्टेशनचा विकास आणि देखभालीसाठी सक्रिय भागीदारी केली आहे. हा दिग्गज वाहननिर्माता भारतात प्रगत ईव्ही क्षमता असलेली इकोसिस्टिमदेखील तयार करत आहे. एमजी डेव्हलपर अँड ग्रांट प्रोग्रामचा भाग म्हणून संबंधित नूतनाविष्कारांचा प्रचार करणे हेदेखील कंपनीच्या सर्वांगिण दृष्टीकोनात समाविष्ट आहे. सर्व एमजी डीलरशिप CCS/CHAdeMO फास्ट-चार्जिंग मानकांबाबत सुसज्ज आहेत. तसेच तेथे सर्व सुसंगत ईव्ही उपलब्ध आहेत.

पाच मार्गी ईव्ही चार्जिंग इकोसिस्टिमचा भाग म्हणून, प्रत्येक झेडएस ईव्हीमध्ये कुठेही चार्जिंग होण्यासाठी एक ऑन बोर्ड केबल येते. एमजीचा eChargeBays शी करार असल्याने ग्राहकांना त्यांचे घर, ऑफिसमध्येही एसी फास्ट चार्जर मोफत इन्स्टॉल करता येते.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya