विवाहितेचा जाचहाट 

 

स्थैर्य, सातारा, दि.४: म्हसवे, ता. सातारा येथील मातोश्री पार्क येथे विवाहिचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. विश्‍वजीत बाबुराव साठे आणि पद्मा बाबुराव साठे रा. मातोश्री पार्क म्हसवे मूळ रा. काठेवाडी, जि. उस्मानाबाद अशी संशयीतांची नावे आहेत. 

याबाबत सौ. अर्चना विश्‍वजीत साठे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती विश्‍वजीत हा दारू पिवून सौ. अर्चना यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत व अर्वाच्च शिवीगाळ करत होता. सौ. अर्चना या नोकरीत असल्याने त्यांच्या पगाराचे पैसेही जबरदस्तने काढून घेत होता. तसेच पद्मा बाबुराव साठे हिने सौ. अर्चना साठे यांच्याशी भांडण करून ‘तु कशी नांदतेस तेच बघते. तुला इथ टिकु देणार नाही’ असे बोलून दमदाटी केली. तसेच वेळोवेळी फोन करुन मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार जाधव तपास करत आहेत.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya