अल्पवयीन मुलीचा विनयभंग 

 


स्थैर्य, सातारा, दि.३: महिला कामावर गेल्यावर घरात एकटी असणार्‍या तिच्या अल्पवयीन मुलीचा एकाने विनयभंग केला. मुलीचा विनयंभग केल्याचा जाब विचारण्यास गेल्यावर संबंधित महिलेसही शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी तानाजी गोविंद पवार रा. जानाई मळाई सोसायटी सोसायटी, कोडोली, कराड असे संशयीताचे नाव आहे. तानाजी पवार याने दि. 30 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराला संबंधित महिला कामावर गेल्यावर मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून मुलीचा विनयभंग केला. मुलीने प्रतिकार केला असता तिला मारहाण केली व कोणास सांगितलेस जीवे मारीन, अशी धमकी दिली. हा प्रकार मुलीने सांगितल्यानंतर तिची आई जाब विचारण्यासाठी तानाजी पवार याच्या घरी गेली. यावेळी तिलाही शिवीगाळ व दमदाटी केली. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तानाजी पवार याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya