जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंगमधून मोटारसायकल चोरीस

 


स्थैर्य, सातारा, दि. 26 : सातारा जिल्हा रुग्णालयाच्या पार्किंगमधून चोरट्याने दुचाकी चोरून नेली. याबाबत आकाश सुरेश निकम रा. कुमठे, ता. कोरेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 22 रोजी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये त्यांनी सिल्व्हर रंगाची मोटारसायकल (एमएच11 एएस 9422) लावली होती. अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून व बनावट चावीचा वापर करून मोटार सायकल चोरून नेली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो. ना. जाधव करत आहेत.