जळगाव येथे 4 अल्पवयीन भावंडांची हत्या

 


स्थैर्य, जळगाव, दि. १६ : रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमली बाई भिलाला हे दांपत्य आपल्या मध्यप्रदेशातील मूळ गावी गेले असता शेतातील घरात चार भावंडे एकटी होती.


रात्रीच्या सुमारास या चारही भावंडांवर कुर्‍हाडीनं वार झाल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी सकाळी शेत मालक शेतात आल्यानंनर हा प्रकार उघडकीस आला आहे.


सईता 12, रावल 11, अनिल 08, सुमन 03 असे दोन भाऊ व दोन बहिणींचा मृतांमध्ये समावेश आहे.


पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत, तर विशेष पोलीस महानिरीक्षक थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल होणार आहेत.


डॉ. प्रवीण मुंडे यांनी म्हटलं, "बोरखेडा गावाच्या शिवारात 4 अल्पवयीन मुलांची हत्या झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. या मुलांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. घटनास्थळाचा पंचनामा सुरू असून कुऱ्हाड सापडली आहे, तरी पुढील तपास सुरू आहे."


Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya