एनसीबी अधिकाऱ्याचा दावा - अर्जुन रामपाल स्वतः शाहरुख खानला ड्रग्‍स पुरवायचा, आम्हाला इंटेलीजेंस एजेंसीकडून पक्के पुरावे मिळाले मुंबई 3 तासांपूर्वी

 

स्थैर्य, मुंबई, दि.३०: बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. एनसीबीच्या चौकशीत ड्रग्स पेडलर्सने बॉलिवूडच्या चार हिरोंची नावे घेतली आहे. यात शाहरुख खान, रणबीर कपूर, अर्जुन रामपाल आणि डिनो मोरियाचा समावेश आहे. यात मोठी माहिती अशी हाती लागली की, अर्जुन रामपाल स्वतः शाहरुख खानला ड्रग्स सप्लाय करतो. आतापर्यंत फक्त अभिनेत्रींची नावे येत होती, आता अभिनेत्यांची नावे यायला लागली आहेत.

एनसीबीच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बॉलिवूडच्या मोठ्या हिरोंच्या नावाचा खुलासा केला आहे. अधिकाऱ्यासोबत झालेल्या बातचीतची पूर्ण रेकॉर्डिंग भास्करकडे उपलब्ध आहे. मागील दोन दिवसांपासून ड्रग्स प्रकरणात हिरोदेखील असल्याची माहिती येत होती. पण, त्यांचे नावे न येता ‘A’, ‘D’ ‘R’ आणि ‘S’ अशी कोड नेम येत होती.

आता हे स्पष्ट झाले आहे की, A म्हणजे अर्जुन रामपाल, D म्हणजे डिनो मोरिया, R म्हणजे रणबीर कपूर आणि S म्हणजे शाहरुख खान आहेत. अनसीबी अधिकाऱ्यांने सांगितले की, ट्रग्स पेडलरकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अर्जुन रामपाल स्वतः शाहरुख खानला ड्रग्स सप्लाय करायचा किंवा अजूनही करतो.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya