घराच्या छपरावर काम करत असताना विजेचा शॉक लागून छपरावरून अठरा फूट खाली पडून एकाचा मृत्यू

 

स्थैर्य, सातारा, दि.१२: घराच्या छपरावर काम करत असताना विजेचा शॉक लागून छपरावरून अठरा फूट खाली पडून एकाचा मृत्यू झाला असल्याची घटना सातारा तालुक्यातील कास या गावामध्ये घडली.

सोमनाथ सावळाराम किर्दत (वय 33, रा. कास पोस्ट अंधारी, ता. जावळी) असे विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमनाथ किर्दत हे घराच्या छपरावर इलेक्ट्रिकचे काम करत होते. त्यावेळी त्यांना अचानक विजेचा धक्का लागला. त्यामुळे ते 17 ते 18 फूट उंचीवरून खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्यालाही गंभीर जखम झाली. त्यांना जखमी अवस्थेत सातार्‍यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले होते. मात्र, तेथेही त्यांची प्रकृती खालावत गेल्याने पुन्हा त्यांना सातार्‍यात आणले. दरम्यान, रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya