राज्यात गुरुवारी दिवसभरात 15 हजारांवर रुग्णांना डिस्चार्ज, एकूण रुग्णसंख्या 14.93 लाख; रिकव्हरी रेट 80.13%

 


स्थैर्य, मुंबई, दि. ९: राज्यात गुरुवारी 13 हजार 397 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 358 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच एकूण संक्रमितांची संख्या 14 लाख 93 हजार 884 झाली आहे. दरम्यान गुरुवारी 15 हजार 575 लोक बरे होऊन घरी गेले. यासोबत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 12 लाख 12 हजार 016 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) 80.13% एवढा आहे. राज्यातील एकूण मृतांचा आकडा 39 हजार 430 झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 41 हजार 986 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya