निंबळकच्या निमजाई मंदिरातून देवीची परमाळ चोरीला; पोलीस घटनास्थळी दाखल

 स्थैर्य, फलटण, दि.३: निंबळक ता. फलटण येथील प्रसिद्ध असलेल्या निमजाई मंदिरामधून निमजाई देवीची परमाळ चोरीला गेलेली असल्याची घटना घडलेली आहे. सदरील परमाळ ही अंदाजे पाच लाख रुपयांहून अधिक किमतीची असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत अधिक तपास करण्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक माहिती त्यांच्याकडून घेतली जात आहे व याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजही फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी तपासत आहेत, अशी माहिती निंबळकचे पोलीस पाटील समाधान कळसकर यांनी दिली.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya