आता अंतराळात होणार खासगी क्षेत्राचा प्रवेश; इस्त्रोची तयारी

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१३: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) हे क्षेत्र खासगी क्षेत्राला खुले करण्याची सर्व तयारी करण्यात आली आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच भविष्यकालीन ग्रहांच्या शोधमोहिमा, अंतराळाबाहेरील मार्गक्रमण इत्यादी खाजगी क्षेत्रासाठी खुल्या होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकारच्या आत्मनिर्भर भारताच्या पथदश्री आराखड्यातील आत्मनिर्भरतेचा एक भाग असून अंतरिक्ष क्षेत्रात खाजगी क्षेत्राला पुढाकार देऊन चालना देत सहभागी करण्यात येईल, असे मत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.


भारतीय खासगी क्षेत्र हे भारताच्या अंतराळ क्षेत्रातील सहप्रवासी असेल. खासगी कंपन्यांना उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी आणि अंतराळ क्षेत्रातील उपक्रमांसाठी समान पातळीवर संधी उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

देशातील अंतराळ क्षेत्रातील उपक्रम, पुरवठा आधारित पध्दतीवरून मागणी आधारीत पध्दतीत त्यामुळे परावर्तीत होईल. भारतीय राष्ट्रीय अंतरीक्ष विकास आणि अधिकार केंद्र स्थापन करून (इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँण्ड ऑथरायझेशन सेंटर) कार्यप्रणाली सुलभ करत, खाजगी क्षेत्राला इस्रोच्या सोयीसुविधा, इतर उपयुक्त मालमत्ता त्यांच्या क्षमता सुधारण्यासाठी वापरता येतील.


खाजगी कंपन्यांना त्यांचे अर्ज पाठविण्यासाठी तयार केलेल्या वेबलिंकची माहिती डॉ. जितेंद्र सिंग यांनी यावेळी दिली. कंपन्यांकडून आणि स्टार्ट अप्स कडून आलेल्या या माहितीचे उच्चस्तरीय समितीद्वारे विेषण केले जाईल, असेही ते म्हणाले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya