पुणे : प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर बुधवारपासून बेपत्ता, सुसाईड नोट सापडल्याने खळबळ, नातेवाईकांची पोलिसात तक्रार

 

स्थैर्य, पुणे, दि.२३: पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर हे बुधवारीपासून बेपत्ता आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळख असलेले गौतम पाषाणकर बुधवारी संध्याकााळी साडे चार वाजल्यापासून बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. 64 वर्षीय गौतम पाषाणकर हे मॉडेल कॉलनी येथून बेपत्ता झाले. यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस तपास सुरू आहे.

पाषणकर हे बुधवारी दुपारी लोणी काळभोर परिसरात कामानिमित्त बाहेर निघाले होते. तिथून ते पानशेतला कामासाठी जात असल्याचे सांगून गेले. त्यानंतरपासून त्यांचा संपर्क झालेला नाही. नातेवाई, कार चालक आणि ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी देखील अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क झाला नसल्याने शोध घेण्यात आला. या प्रकरणी सध्या पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान गौतम पाषाणकर यांची सुसाईट नोड सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्याने आपल्या ड्रायव्हरकडे एक लिफाफा दिलेला होता. घरी गेल्यानंतर शंकर यांच्या पत्नीने हा लिफाफा उघडून पाहिलाय. यावेळी त्यात सुसाईड नोट होती. काही दिवसांपासून व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाला असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आले आहे. नुकसानामुळेच पाषाणकर हे तणावात होते.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya