कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई - शैलेश सूर्यवंशी

 

स्थैर्य, खटाव, दि.१०: राज्य सरकार व सातारा जिल्हाधिकारी यांच्या कोरोना पार्श्वभूमीवर आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक नागरिकांवर दंडात्मक कारवाईकरण्यात आली असून ही मोहीम अधिक कडक करणार असल्याचे माण खटाव चे नूतन प्रांत अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी सांगितले.

कोरोना संसर्गजन्य आजार नियंत्रनात आणण्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न शील असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मास्क न वापरणे, दुकानात गर्दी करणे, उघड्यावर थुंकणे ,सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणे या विविध कारणाकरिता ही कारवाई होत आहे. या कारवाई अंतर्गत वडूज नगरपंचायतीने आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे. या दंडात्मक कारवाईचा भाग म्हणून श्री शैलेश सूर्यवंशी - इन्सिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी मान खटाव यांनी आदेश केला असून स्वतः सूर्यवंशी यांनी वडूज शहरातुन पायी चालत फेरफटका मारताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई केली असून अशा कारवाया रोज करण्याचे आदेश नगरपंचायत ला दिले आहेत.

सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम चालू आहे त्या अनुषंगाने सर्वेक्षणासाठी आलेल्या सर्व पथकांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी वडूज नगरपंचायत वडूज माधव खांडेकर यांनी केले आहे.यावेळी नायब तहसिलदार शिर्के,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शेख,डॉ संतोष मोरे,आदींची उपस्थिती होती.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya