वडूज मध्ये रासप चं एक दिवसीय धरणं आंदोलन

 


स्थैर्य, खटाव, दि. २१ (विनोद खाडे) : खटाव माण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट भरपाई देण्यात यावी,या मागणीसाठी रासप च्या वतीने सातारा जिल्ह्यातील वडूज येथे एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आले.


मागील काही दिवसांत खटाव व माण तालुक्यात अतिवृष्टी झाली असून यामध्ये शेतकऱ्यांची हाता तोंडाला आलेली काही पिके तर नुकतीच पेरणी केलेली पिके, जमिनीत पाणी साचल्याने उध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांना पंचनामे न करता तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट प्रत्येकी 50हजार रुपये अनुदान थेट खात्यात जमा करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने वडूज येथील एक दिवसीय धरणं आंदोलनात करण्यात आली. यावेळी रासप युवक जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देवकर, रासप महिला आघाडी च्या जिल्हा अध्यक्षा पूजा घाडगे, खटाव तालुका अध्यक्ष प्रा दिलीप डोईफोडे,श्रीकांत रजपूत, विष्णू घाडगे आदींची उपस्थिती होती.