राहुल खाडे यांची उपाध्यक्षपदी निवड

 


स्थैर्य, कातरखटाव, दी. 30 : एनकुळ (ता. खटाव) येथील राहुल सदाशिव खाडे यांची पिंपरी चिंचवड शहर भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष आ. महेशदादा लांडगे, आ. लक्ष्मणभाऊ जगताप, प्रदेश कार्यकारणी सदस्य सदाभाऊ खाडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोते उपस्थित होते. राहुल हे सदाभाऊ खाडे यांचे सुपुत्र आहेत. या निवडीबद्दल त्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya