हाथरसला पायी चालत जाणाऱ्या राहुल आणि प्रियंका गांधींना अटक; पोलिसांकडून राहुल यांना धक्काबुक्की, हाताला मुकामार

 


स्थैर्य, दि.२: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये गँगरेप पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाणाऱ्या राहुल गांधींना ग्रेटर नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या गावाकडे जाताना राहुल आणि प्रियंका यांची गाडी अडवण्यात आली, त्यानंर दोघे पायी हाथरसकडे जात असताना पोलिसांनी राहुल यांना ताब्यात घेतले. यादरम्यान पोलिसांसोबत झालेल्या धक्काबुक्कीत राहुल खाली पडले, पोलिसांनी राहुल यांच्या शर्चटी कॉलरदेखील पकडली. काँग्रेस नेत्यांचे म्हणने आहे की, राहुल यांच्या हाताला दुखापतही झाली आहे.

याबाबत राहुल गांधी म्हणाले की, "पोलिसांनी मला धक्का दिला, खाली पाडले आणि लाठीचार्ज केला. या देशात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना चालण्याचा अधिकार आहे का ? सामान्य व्यक्ती चालू शकत नाही ? मला पीडितेच्या कुटुंबाची भेट घ्यायची आहे,मला ते थांबवू शकणार नाहीत."

यादरम्यान राहुल यांनी पोलिसांना विचारले की, कोणत्या कलमाअंतर्गत मला अटक करत आहात ? पोलिस म्हणाले- सर तुम्ही कलम-188 चे उल्लंघन केले आहे.

काय आहे कलम 188 ?

1897 च्या महामारी कायद्याच्या सेक्शन 3 मध्ये उल्लेख आहे की, जर कोणी कायदा मोडला आणि नियमांचे पालन केले नाही, तर त्याला कलम 188 अंतर्गत अटक केली जाऊ शकते. या कायद्यात शिक्षेची तरतूदही आहे. यात एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याच्या निर्देशांचे उल्लंघन केल्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो.

पीडित कुटुंबाला धमकी देऊन शांत करू इच्छिते ही सरकार ?- प्रियंका

प्रियंका यांनी ट्वीट करुन म्हटले की, गँगरेप पीडितेच्या वडिलांना बळजबरीने घेऊन गेले. सीएमसोबत वीसीच्या नावावर फक्त दबाव टाकण्यात आला. पीडितेचे वडील चौकशीने संतुष्ट नाहीत. सध्या त्यांच्या कुटुंबाला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. धमकावून त्यांना शांत करू इच्छिते का ही सरकार ?

गावाला छावणीचे स्वरुप, मेन रोडवर बॅरिकेड लावले

पीडितेच्या गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणत्याच बाहेरच्या व्यक्तीला पीडितेच्या घरापर्यंत जाता येऊ नये, यासाठी गावाबाहेर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मीडियालाही गावात जाण्याची परवानगी नाही. गावाच्या एंट्री पॉइंटवर एडीएम लेव्हलचे अधिकारी तैनात आहेत.

बलात्काराची पुष्टी नाही- पोलिस

हाथरसचे एसपी विक्रांत वीरने सांगितले की, अलीगड हॉस्पीटलच्या मेडिकल रिपोर्टमध्ये पीडितेच्या शरीरावर जखमांचे निशान असल्याचे सांगितले आहे. पण, बलात्कार झाल्याची पुष्टी नाही. डॉक्टरांचे म्हणने आहे की, फोरेंसिक रिपोर्ट आल्यानंतरच बलात्काराची पुष्टी होईल.

भाजपचा आरोप- काही लोक पॉलिटिकल टूरिज्म करत आहेत

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या घटनेचे सर्वांनाच दुःख आहे आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. यासाठी उत्तर प्रदेश सरकार प्रयत्नशील आहे. पण, काही लोक पॉलिटिकल टूरिज्मद्वारे तनाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Previous Post Next Post