मटका अड्ड्यावर छापा, 11 जण ताब्यातसुमारे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

 

स्थैर्य, सातारा, दि.१४: सातारा शहर पोलिसांनी अवैध मटका अड्ड्यावर छापा मारून 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी सहाजणांना ताब्यात घेतले आहे. 

याबाबत माहिती अशी, गुरुवार परज परिसरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर सातारा पोलिसांनी छापा टाकला. यावेळी शरद रामराव साळुंखे, रा. शाहूनगर सातारा, दत्तात्रय मुगुटराव जाधव रा. 272 शनिवार पेठ सातारा, शशिकांत रामचंद्र भिसे रा. कुडाळ, ता. जावली, मोहन बापू शेलार रा. 316 शनिवार पेठ सातारा, राजू अर्जुन साळुंखे रा. करंजे तर्फ सातारा, श्रीकांत रामचंद्र इंगळे रा. नुने ता. जि. सातारा हे दिलावर मोहीदीन शेख रा. शनिवार पेठ सातारा याच्यासाठी मुंबई मटका जुगार चालवत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांच्याकडूुन मोबाईल, मटक्याची स्लीप बुक, बॉलपेन, एक मटक्याचा आजचे तारखेचे आकडे लिहलेला जैस्टीक ब्लैक बोड, घड्याळ असा 50 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. 

दरम्यान, एमआयडीसीतील प्रीती हॉटेलच्या मागे सुरू एका पान टपरीच्या मागे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून 5 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दीड लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. महेश दिनकर भोईटे वय -27 कोडोली, योगेश महेश अडागळे वय 20 रा. प्रतापसिंहनगर, ता. सातारा, सचिन दादासो कदम वय 20, रा. वनवासवाडी कृष्णानगर ता. सातारा, लालडे इस्माईल बागवान वय 48 वर्षे कर्मवीर नगर ता. सातारा, रामचंद्र दगडू पवार वय 44 रा. कोडोली हे चंदू चोरगे रा. रविवारपेठ व रामभाऊ साठे रा. प्रतापसिंहनगर यांच्यासाठी मुंबई मटका घेत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून 3 दुचाकी, मोबाईल, मटक्याचे साहित्य असा दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya