निंभोऱ्याचे राजाभाऊ मदने यांचा श्रीमंत रामराजेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश 

 

स्थैर्य, फलटण, दि८ : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निंभोरे, ता. फलटण येथील युवा नेते राजाभाऊ मदने यांनी विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नुकताच जाहीर प्रवेश केलेला आहे. फलटण तालुक्याचा विकास हा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळेच झाला असून आगामी काळात निंभोरे गावचा विकास करण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सर्व जण कटिबद्ध असू असा विश्वासही या वेळी त्यांनी व्यक्त केला. 

या वेळी विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सह्यायक मुकुंद रणवरे (काका), गिरवीचे पै. संजय मदने व सनी राजाभाऊ मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.