रणजीत सुर्यवंशी यांचा प्रोफेशनल मेकअपआर्टिस्ट म्हणून सन्मान


 

स्थैर्य, वावरहिरे, (अनिल अवघडे) : आरडी स्टुडिओ यांच्या माध्यमातून आणि प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि डिझायनर सुहास दादा गौते यांच्या प्रयत्नातून घेण्यात आलेल्या सात दिवशीय प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट वर्कशॉपमध्ये शेवटच्या दिवशी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या माध्यमातून रणजीत सुर्यवंशी यांना प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून घोषित करण्यात आले.

यावेळी मेकअप मी अकॅडमी यांच्यामार्फत सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन त्यांचा उचित गौरव करण्यात आला. यावेळी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि डिझायनर सुहास गौते, डायरेक्टर संतोष कापसे, तसेच मल्हारी पवार यांची प्रमुख उपस्थितीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya