सातारारोड येथील अल्पवयीन मुलाचा लैगिंक छळ करून खंडणी उकळली; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल; दोन युवकांना अटक

 

स्थैर्य, सातारारोड, दि.१: सातारारोड, ता. कोरेगाव येथील एका अल्पवयीन मुलाचा लैगिंक छळ करून त्याचे फोटो आई-वडिलांना दाखवण्याची धमकी देत हजारो रुपयांची खंडणी उकळणार्‍या दोन युवकांच्या मुसक्या कोरेगाव पोलिसांनी आवळत त्यांना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विक्रम उत्तम क्षत्रिय व शुभम तानाजी फाळके या दोघांनी सातारारोड येथील एका अल्पवयीन मुलाला हेरून जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून पाटखळ माथा येथील लॉजवर नेले. लॉजवरील एका रुममध्ये घेऊन गेल्यानंतर जबरदस्तीने मारहाण करून विवस्त्र केले. त्या रुममध्ये अगोदर एक महिला होती. संबंधित महिला व त्या युवकांनी त्याचा लैंगिक छळ केला. जबरदस्तीने काही गोष्टी करण्यास भाग पाडले. त्यानंतर अल्पवयीन मुलाला घेऊन ते परत सातारारोडला आले. त्याच दिवशी दुपारी पुन्हा त्या अल्पवयीन मुलाला बरोबर घेऊन पाटखळ माथा येथील लॉजवर गेले. यावेळी विक्रम क्षत्रिय व शुभम फाळके यांनी सांगितले की, ‘तुझे फोटो आमच्याकडे आहेत. ते तुझ्या आई-वडिलांना दाखवू,’ अशी धमकी देत ब्लॅकमेल केले. ‘तू आम्हाला 17 हजार रुपये ताबडतोब आणून दे.’ धमकीच्या भीतीने घाबरलेल्या अल्पवयीन मुलाने घरातील कपाटात ठेवलेले 17 हजार रुपये गुपचूपपणे शुभम फाळके याच्याकडे आणून दिले.

असाच प्रकार पुन्हा दि. 17 सप्टेंबर रोजी घडला. विक्रम क्षत्रिय याने शुभम फाळके याच्या हस्ते निरोप पाठवून ब्लॅकमेल करण्याची धमकी देत पुन्हा 13 हजारांची मागणी केली. या वेळी त्या अल्पवयीन मुलाने वडिलांनी घरातील कपाटात ठेवलेली काही रक्कम त्यातील 13 हजार रुपये काढून खंडणी मागणार्‍या विक्रम क्षत्रिय याच्या हातात दिली, अशाप्रकारे सातारारोड येथील अल्पवयीन मुलाचा लैगिंक छळ करण्यात आला. 

याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे पालक संजय दिनकर विचारे यांनी फिर्याद दिली असून, या घटनेचा अधिक तपास सातारारोड पोलीस दूरक्षेत्राचे एपीआय संतोष साळुंखे करत आहेत.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya