हाथरस घटनेची फलटण तालुक्यातील उपळव्यात पुनरावृत्ती; वंचित बहुजन आघाडीचा दावा

 

स्थैर्य, फलटण, दि,१७ : उपळवे, ता. फलटण येथे उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेची पुनरावृत्ती झाली असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष रामचंद्र गायकवाड यांनी केलेला आहे. या बाबत सविस्तर निवेदन तहसीलदार समीर यादव यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलेले आहे. 

या बाबत निवेदनातील माहिती अशी की, उपळवे येथुन ३ ऑक्टोबर रोजी कु. अक्षदा देविदास अहिवळे ही बेपत्ता झालेली होती. मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनला करण्यात आलेली होती. सुमारे पाच दिवसांनंतर मुलीचा मृतदेह गावाशेजारील विहिरीमध्ये सापडला. मृतदेह सापडल्यानंतर अजूनही पोस्ट मार्टमचा रिपोर्ट दिला गेला नाही. या सर्वपार्श्वभूमीवर नक्कीच काहीतरी षडयंत्र असून याचा तपास लवकरात लवकर करण्यात यावा. पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी ही मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी केलेली आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya