म्हसवड येथील शिशुगृहात दोन बालके दाखल नातेवाईकांनी संपर्क करावा

 

सातारा दि.१५ : कु. रेणुका पिंटु ससाणे वय वर्षे अंदाजे ८ वर्षे व चि.कृष्णा पिंटू ससाणे वय वर्षे अंदाजे ३ हया बलिका कराड पुलाखाली राहत होत्या यांची आई 1 जून रोजी मयत झाल्याने व वडीलांचा शोध लागत नसल्याने कराड पोलीसा मार्फत

3 जून रोजी बालकल्याण समितीच्या आदेशाने द्रोणागिरी शिक्षण संस्था संचलित शिशुगृह म्हसवड, ता. माण, जि. सातारा या संस्थेत पुढील पुनर्वसन व संगोपनासाठी दाखल केले आहे.या बालकांच्या वडिलांचा व नातेवाकांचा शोध घेण सुरू असून तशी माहिती असल्यास बाल कल्याण समिती निरिक्षणगृह, सातारा अथवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सातारा फोन.नं. ०२१६२-२३७३५३ संपर्क साधावा अन्यथा या बालकांचे शासकीय नियमानुसार कायमस्वरूपी पुनर्वसन केले जाईल याची नोंद घ्यावी, असे माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, डी. वाय.ढेपे यांनी कळविले आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya