ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचा वाढदिवस साजरा केला जाणार नाहीस्थैर्य, सातारा, डी. 24 :  माजी मंत्री, ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचा रविवार दि. २५ ऑक्टो. रोजी होणारा वाढदिवस साजरा केला जाणार नाही. भोसले यांचे नातेवाईक, स्नेही माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी रात्री उशिरा नाशिक येथे निधन झाले. भोसले व पाटील यांचा कौटुंबिक नातेसंबंध आणि त्याहीपलीकडे असणारा जिवलग स्नेह यामुळे विनायकदादा पाटील यांच्या निधनाची घटना त्यांच्यासाठी दुःखद, वेदनादायी, क्लेशदायी आहे. या पार्श्वभूमीवर प्रतापराव भोसले यांचा वाढदिवस साजरा केला जाणार नाही तसेच रविवारी ते शुभेच्छा स्वीकारणार नाहीत आणि निवासस्थानी असणार नाहीत. याची नोंद सर्वांनी घ्यावी, अशी विनंती भोसले कुटुंबीयांनी केली आहे.

 

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya