कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री बिरदेवाची यात्रा यावर्षी रद्द

 

स्थैर्य, फलटण, दि.२७ :- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री बिरदेवाची यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली असल्याची माहिती श्री बिरदेव देवस्थान ट्रस्ट जाधववाडी यांनी दिली आहे.

सध्या संपूर्ण जगाने कोरोनाची धास्ती घेतली आहे. कारण कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्याने गर्दीच्या ठिकाणी याचा फैलाव जास्त होतो. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार आरोग्य विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या आदेशानुसार  यात्रा आयोजित करण्यास मनाई असून जाधववाडी फलटण येथे श्री बिरदेवाची यात्रा हि दरवर्षी प्रमाणे कोजागिरीच्या दुसऱ्या दिवशी असते यावर्षी दि २९,३० व ३१ ऑक्टोबर २०२० रोजी होणारी ही यात्रा यावर्षी शासनाच्या आदेशाने रद्द करण्यात आली आल्याची माहिती श्री बिरदेव देवस्थान ट्रस्ट जाधववाडी यांनी दिली आहे.