एम.एस.सी (काॅम्प्युटर सायन्स) प्रवेश परीक्षेत ॠषभ बाळासाहेब काळुखे पुणे विद्यापीठात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे यांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न

 

स्थैर्य, फलटण, दि.७: शिक्षण क्षेत्रात देशात अग्रगण्य असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या एम.एस.सी (काॅम्प्युटर सायन्स) प्रवेश परीक्षेत ॠषभ बाळासाहेब काळुखे रा.कोळकी फलटण याने ८९.३६%* *गुण मिळवून पुणे विद्यापीठात तृतीय क्रमांक मिळवला.

ॠषभच्या या उज्वल यशाबद्दल फलटण तालुक्याचे लाडके नेते व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी भाऊ* *कापसे,तुषारभैय्या निंबाळकर व चंद्रनील पर्यटन काळुखे परिवार उपस्थित होते.ॠषभच्या या उज्वल यशाबद्दल चंद्रनील पर्यटन मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya