जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात अर्जांच्या त्रुटींच्या पुर्ततेसाठी 19 ते 21 ऑक्टोंबर कालावधीत विशेष मोहिम

 


स्थैर्य, सातारा दि.१६: सन २०१९-२० मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकणा-या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील ज्या विदयार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केले आहेत व जे विद्यार्थी सन 2020-2021 मध्ये व्यावसायीक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छितात, त्यातील काही अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यांची पूर्तता करण्यासाठी अर्जदारांना त्यांच्या पत्त्यावर पत्राने तसेच मोबाईलवर एस.एम.एस. द्वारे त्रुटीची पूर्तता करण्यासाठी कळविले आहे. तथापि काही विदयार्थ्यांनी या कार्यालयाने कळविलेल्या त्रुटींची अद्याप पूर्तता केली नसल्याने त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. अर्जांची पुर्तता करण्यासाठी १९ ते २१ ऑक्टोबर २०२० या तीन दिवसांच्या कालावधीत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, जुनी एमआयडीसी रोड, सातारा या कार्यालयात सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत विशेष मोहिमेचे (कॅम्प) आयोजन केले आहे, असे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती स्वाती इथापे यांनी कळविले आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya