कोचिंग क्लासेस सुरू करा; कोचिंग क्लासेस असोसिएशनची मागणी

 


स्थैर्य, फलटण, दि. २२ : सध्या महाराष्ट्र मधील सर्व कोचिंग क्लासेस बंद असून लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कोचिंग क्लासेस सुरू करावेत अशी मागणी कॉचींग क्लासेस असोसिएशन तर्फे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे करण्यात आलेली आहे.

यावेळी कोचींग क्लासेस असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रताप चव्हाण, सरचिटणीस प्रा. सोहेल सुभेदार, सहकोषाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण चवरे, सहसंघटक गणेश नांदले, प्रवक्त्या रणजित तांबे यांच्या सह संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.